Nigdi news : बनावट सोने तारण ठेवत घेतले 27 लाखांचे कर्ज

एमपीसी न्यूज  – तिघांनी मिळून 813 ग्रॅम वजनाचे बनावट सोने तारण (Nigdi news) ठेऊन 27 लाख 80 हजार 100 रुपये घेतले. सोने बनावट असल्याचे समजल्यानंतर सोने तारण घेणाऱ्या कंपनीने पैशांची मागणी केली. त्यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. हा प्रकार 19 मार्च 2021 ते 25 मार्च 2022 या कालावधीत निगडी येथे घडला.

हिमगिरी हायर पर्चेस लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश राजमल जैन (वय 52) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. 3) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष भागवत बागल (वय 40, रा. किवळे), राहुल भीमाप्पा बालीगर (वय 40 , रा. देहूरोड), सुनील काशिनाथ वाघमारे (वय 47, रा. किवळे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ravet Crime News : महिलेची आर्थिक फसवणूक करत लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमगिरी हायर पर्चेस लिमिटेड ही कंपनी सोने तारण घेऊन कर्ज देण्याचे काम करते. आरोपींनी 813.7 ग्रॅम वजनाचे बनावट सोने आणले. सोने खरेदीच्या खोट्या पावत्या दाखवून जैन यांच्या कंपनीकडून 27 लाख 80 हजार 100  रुपये सोने तारण कर्ज आरोपींनी घेतले. घेतलेले कर्ज परत न करता कंपनीची फसवणूक केली. तसेच कर्जाची रक्कम मागितली असता संतोष बागल याने फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी संतोष बागल आणि सुनील वाघमारे या दोघांना (Nigdi news) अटक केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.