Nigdi News: ‘मॉडर्न’मध्ये मराठी राजभाषा दिन, राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

एमपीसी न्यूज – यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये ऑनलाईनव्दारे मराठी राजभाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन आज (शनिवारी) मोठ्या उत्साहाज साजरा करण्यात आला.

संस्थेचे सदस्य राजीव कुटे, पर्यवेक्षिका सुरेखा कामथे यांनी कुसुमाग्रज व डॉ.सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानंतर विज्ञान शिक्षक रामचंद्र घाडगे यांनी मराठी भाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व सांगितले.

यानंतर विज्ञान शिक्षक गंगाधर वाघमारे यांनी ध्वनिचे विविध प्रयोग, संतुलित व असंतुलित बलाचे प्रयोग, चुबंकीय प्रयोग, पेरिस्कोपचे प्रयोग ऑनलाईन दाखवले.

_MPC_DIR_MPU_II

तसेच अनुराधा आंबेकर यांनी आम्ल, आम्लारीचे प्रयोग तसेच मनिषा बोत्रे यांनी प्रकाशाचे विकिरण हा प्रयोग प्रिझम, भिंग व लेझर किरण यांच्या साहाय्याने दाखवला. शाळेतील विद्यार्थांनी घरी बसून ऑनलाईन पध्दतीने या कार्यक्रमाचा आनंद घेतला.

यावेळी सुरेखा कामथे यांनी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांवर कविता सादर केली. शाळेची विद्यार्थीनी महादेवी होनराव हिने सर्वाचे आभार मानले. या ऑनलाईन कार्यक्रमात शाळेतील तीनशेपेक्षा अधिक विद्यार्थी व पालकांनी सहभाग घेतला.

या ऑनलाईन कार्यक्रमासाठी मुख्याधापक गोकुळ कांबळे, संस्था उपकार्यवाह शरद इनामदार, कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सचिव शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, प्रमुख्याध्यापिका मृगजा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1