Nigdi News: मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांचा ‘कोरोना योध्दा’ पुरस्काराने सन्मान

एमपीसी न्यूज – कोरोनाकाळात जीवन जगणे कठीण झालेले असताना लोकप्रतिनिधी या नात्याने प्रभागातील हजारो नागरिकांच्या मदतीसाठी धाव घेणारे प्रभाग क्रमांक 13 यमुनानगर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष, नगरसेवक सचिन चिखले यांच्या कार्याची दखल घेऊन प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संचलित मॉडर्न शिक्षण संस्था आणि माणुसकी सोशल फाउंडेशनच्या वतीने चिखले यांना ‘कोरोना योध्दा’ हा किताब देऊन सन्मान करण्यात आला आहे.

कोरोना विषाणूच्या पहिल्या आणि दुस-या लाटेचा मोठा फटका शहरातील नागरिकांना बसला. नागरिकांचे जीवन संकटात सापडले. कामगारांच्या नोक-या गेल्या, मजुरांचा रोजगार बुडाला, विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले. नागरिकांना एकवेळचे जेवन मिळने कठीण झाले. उपासमारी होऊन नागरिकांचा जीव संकटात सापडला असताना सचिन चिखले यांनी प्रभागातील नागरिकांच्या मदतीसाठी जीवाचे राण केले.

तीन हजार 500 नागरिकांना दोन महिने सलग जेवणाची व्यवस्था केली. त्यांच्या माध्यमातून जेवणाचे डबे घरपोच होत होते. 800 कुटुंबियांना किराणा मालाच्या कीट वाटप करण्यात आले. नागरिकांची इम्युनिटी पावर स्ट्राँग ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने अर्सेनिक अलबम या टॅबलेट्स आणि निर्जंतूक सॅनिटायझर वाटप करण्यात आले. मास्क वाटप करण्यात आले. आजारी नागरिकांना तात्काळ उपचार मिळवून देण्यासाठी पालिकेच्या वैद्यकीय यंत्रणेला सूचना दिल्या. प्रभागातील नागरिकांसाठी खास उपचार पध्दतीचा अवलंब त्यांनी केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे प्रभागातील अनेकांना वेळेत उपचार मिळू शकले.

संपूर्ण प्रभागात औषध फवारणी करण्यात आली. शाळा, कॉलेजमध्ये व परिसरात औषध फवारणी करण्यात आली. अंध, अपंग, ज्येष्ठ अशा 1500 गरजू नागरिकांना किराणा किट घरपोच वाटप केल्या. नागरिकांना कोरोना संक्रमणाचा धोका टाळून भाजीपाला खरेदी करता यावा, यासाठी पवळे क्रिडांगण येथे भाजी मंडई करण्यात आली. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी घरोघरी जाऊन नागरिकांची अँण्टीजेन टेस्ट करण्यात आली.

प्रत्येक व्यापारी व्यक्तीची टेस्ट करण्यात आली. कोरोनाकाळात दोन महिने पोलीस आणि डॉक्टर कर्मचा-यांना दोनवेळचे जेवणाचे डबे वाटप करण्यात आले. लॉकडाऊनमुळे परप्रांतिय नागरिकांना ई-पास काढून त्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्याची व्यवस्था केली. ज्यांचे कोणी नाही, अशा कुटुंबातील मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीतील कर्मचा-यांना मदत केली. उपचारासाठी रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले. रुग्णालयांकडून अकारली जाणारी वाढीव बिले कमी करण्यासाठी मदत केली. अनाथ व्यक्तींचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा अंत्यविधी चिखले यांनी स्वःता केला.

गणेशोत्सवामध्ये घरगुती गणेश विसर्जनासाठी फिरते विसर्जन कुंड तयार केली. त्यामुळे कोरोना काळात घराबाहेर पडण्यास निर्बंध असल्यामुळे प्रभागातील नागरिकांना सोय झाली. नागरिकांसाठी ठाकरे क्रिडा मैदानावर लसीकरण केंद्र सुरू करण्याची पहिली मागणी चिखले यांनी केली. रक्तदान व प्लाझ्मादान शिबीर घेण्यात आले.

फायनान्स कंपन्यांकडून नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी चर्चा करून तोडगा काढण्यास मध्यस्ती केली. रुग्णांलयांमधील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाला योग्य ते सहकार्य केले. ही कामे करताना मित्र परिवार आणि पोलीस कर्मचा-यांची मोलाची साथ मिळाली अशी भावना चिखले यांनी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.