Nigdi News : निगडी येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळा स्थलांतरास मनसेचा विरोध

एमपीसीन्यूज : निगडी चौकातील लोकमान्य टिळक यांचा पुतळा अन्यत्र हलविण्यास मनसेने विरोध केला आहे. तसेच हा पुतळा आहे त्याच ठिकाणी पूर्णाकृती उभारावा, अशी मागणीही मनसेच्यावतीने करण्यात आली आहे.

याबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त आणि अ प्रभागाचे अधिकारी चंद्रकांत इंदुलकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.

निगडी येथिल कै. मधुकर पवळे उड्डाणपुलाजवळील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. याबाबत गेल्या वर्षी पुतळा सुशोभीकरणासाठी निधी मंजूर करण्यात आला होता.

त्यासाठी निविदाही काढण्यात आली होती. मात्र, तरीही हे काम अद्याप सुरु झाले नसल्याबाबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

_MPC_DIR_MPU_II

त्यातच आता काही व्यापाऱ्यांना खुश करण्यासाठी लोकमान्यांचा पुतळा दुसरीकडे स्थलांतरीत करण्याचे प्रयत्न चालू आहे. त्यामुळेच लोकमान्यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यास विलंब होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

या प्रश्नी महापालिका आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून पुतळा परिसराचे सुशोभीकरण करावे. त्याचबरोबर आहे त्याच जागी लोकमान्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा अन्यथा मनसेतर्फे आंदोलन केले जाईल, असा इशाराही मनसेने दिला आहे.

मनसेचे शहराध्यक्ष तथा महापालिका गटनेते सचिन चिखले, शहर उपाध्यक्ष बाळा दानवले, रुपेश पटेकर, महिला आघाडीच्या शहर सचिव सीमा बेलापूरकर आदींसह विशाल मानकरी, मयूर चिंचवडे, सुशांत साळवी, ओंकारा पाटोळे, सचिन मिरपगारे, दिपेन नाईक, शंतनु चौधरी, जयेश मोरे, ॠशिकेष कांबळे, अजय मोरे आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.