Nigdi News: महापालिकेतर्फे 150 दिव्यांग कुटुंबांना शिधा वाटप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दिव्यांग कल्याण विभाग व ॲाक्सफॅम इंडिया या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने निगडी ओटास्कीम परिसरांत राहणाऱ्या 150 अंध कुटुंबांना महापौर ऊषा ढोरे यांच्या हस्ते आज (मंगळवारी) शिधा वाटप करण्यात आले.

नागरवस्ती विभागाचे उपायुक्त अजय चारठणकर ,दिव्यांग विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, ॲाक्सफॅम इंडियाचे प्रकल्प संचालक परमेश्वर पाटील,अंध संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर जोगदंड आदी उपस्थित होते. सुमारे 150 अंध बांधवांना पंचवीस किलो तांदूळ, पाच किलो गहू, पाच किलो ज्वारी, गोडेतेल, साखर व डाळी सह साबण व सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड शहरातील दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. ॲाक्सफॅम सारख्या संस्था पुढे येवून अंध रहिवाशांना कोरोनाच्या काळात सहकार्याचा हात देत आहेत तसेच इतरांनीही पुढे यावे, असे आवाहन महापौर ढोरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.