Nigdi News : बालकांवरील अन्याय रोखण्यासाठी सकारात्मक उपायांची गरज : डॉ. सागर कवडे

एमपीसी न्यूज -सामाजिक परिस्थितीमुळे बालकांवर होणारे अन्याय, भेदभाव व असमानता दूर करण्याकरिता सकारात्मक उपाय योजना व कार्यवाही करण्याची गरज  आहे. नकळत घडलेल्या एखाद्या गुन्हाचे विपरित परिणाम बालकांच्या शिक्षण, रोजगार व अन्य ठिकाणी घडतात. त्यामुळे त्यांनी आपली शक्‍ती योग्य मार्गाला लावून चांगले जबाबदार व सज्ञान नागरिक बनावे, असे आवाहन पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्‍त डॉ. सागर कवडे यांनी केले.

बाल वयात दिशा भरकटलेल्या मुलांसाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या संकल्पनेतून समुपदेशन व मार्गदर्शन कार्यक्रम आज (मंगळवारी दि.15) आयोजित करण्यात आला होता. ओटा-स्किम परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमात 14 ते 18 वर्षे वयोगटातील एकूण 148 बालकांनी आपला सहभाग नोंदविला.

पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्‍त डॉ. सागर कवडे यांनी यावेळी मुलांना मार्गदर्शन केले.

मानसोपचार तज्ञ डॉ.राजीव नगरकर यांनी सर्व मुलांचा नेमका कल ओळखून समुपदेशन करून त्यांचे आवडीच्या क्षेत्रात करिअर कसे घडवता येईल याबाबत त्यांना मार्गदर्शन केले.

स्वत:चे अस्तित्व निर्माण करणारे अनेक यशस्वी उद्योजक झोपडपट्टी भागतून घडले आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून तुम्हीही एक यशस्वी उद्योजक घडू शकता या संधीचा फायदा घ्या, असे आवाहन पिंपरी चिंचवड सिटीझन फोरमचे व्यवस्थापक तुषार शिंदे यांनी उपस्थित मुलांना केले.

याशिवाय सिटीझन फोरमचे अविनाश चिलेकर, विमल फाउंडेशनचे विल्यम साळवे यांनीही उपस्थित मुलांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे नियोजन निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, पोलीस अमंलदार कपिलेश इगवे, अमोल मुठे, पिंपरी चिंचवड सिटीझन फोरमचे ऋषिकेश तपशाळकर, सुर्यकांत मुथीयान यांनी केले.

हा कार्यक्रम पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-1)  मंचक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त डॉ.सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, पोलीस अमंलदार कपिलेश इगवे, अमोल मुठे याशिवाय चिंचवड सिटीझन फोरमचे ऋषिकेश तपशाळकर, तुषार शिंदे, सुर्यकांत मुथीयान तसेच, सदाबहार फाउंडेशनचे पाटील, संदेश स्पोर्ट फाउंडेशचे संदेश बोर्डे, हेवन स्पोर्ट फाउंडेशचे हर्षद कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी साळवे, गंगा देढे, सतोष शिंदे, हौसराज शिंदे, रोहित काळभोर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.