Nigdi News: आचारसंहितेच्या शिथिलतेनंतर निगडीतील उड्डाणपूल वाहतुकीसाठी होणार खुला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात सुरु असलेल्या ग्रेडसेपरेटर, उड्डाणपुल व वर्तुळाकार रस्त्याचे (रोटरी) काम वेगात सुरु आहे. त्यातील पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. वाहतूक व्यवस्था सुरळित करण्यासाठी पुणे-मुंबई महामार्गावरील भाग खुला करण्याचे नियोजन आहे. पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची, माहिती महापालिकेचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी दिली.

पुणे – मुंबई जुन्या महामार्गावरील निगडीच्या भक्तीशक्ती समूह शिल्प चौकात उड्डाणपूल, ग्रेडसेपरेटर आणि वर्तुळाकार मार्गाचे काम गेल्या अडीचे वर्षांपासून सुरु आहे. या कामामुळे वाहनचालकांना सुमारे अडीच किलोमीटर अंतराचा वळसा मारुन ये-जा करावी लागत आहे.

_MPC_DIR_MPU_II

या प्रकल्पातील निगडी ते दहूरोड मार्गावरील सुमारे एक किलोमीटर अंतराच्या उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाल्याने तेथून वाहतूक सुरु करावी. वाहनचालक आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.

याबाबत विचारले असता श्रीकांत सवणे म्हणाले, ”उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्प्यात असून, काही कामे अद्याप शिल्लक आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने उड्डाणपूल सुरक्षित आहे का हे पाहण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून पाहणी केली जाईल. त्यानंतर अंतिम तपासणी अहवाल आल्यानंतर पूल खुला करण्याचा मार्ग मोकळा होईल.

सध्या पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. डिसेंबरच्या दुस-या आठवड्यात भक्तीशक्ती पुलावरील पुण्याकडून मुंबईकडे जाणे आणि मुंबईहून पुण्याच्या दिशेने येण्याचा मार्ग वाहतुकीस खुले करण्याचे नियोजन आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.