Nigdi News : निगडी येथील यमुना नगरमध्ये गुढीपाडवा निमित्त शोभयात्रा

एमपीसी न्यूज – निगडी येथील यमुनानगर मध्ये,  आज (22 मार्च) गुढीपाडव्यानिमित्त (Nigdi News) शोभयात्रा निघाली. सकाळी साधारण 7.30 च्या दरम्यान ह्या शोभयात्रेचा आरंभ झाला.भारतीय संस्कृती मंच ने या शोभयात्रेचे आयोजन केले होते. भारतीय संस्कृती मंच ने आयोजित केलेली ही 23 वी शोभयात्रा होती.

 

 

 

 

Warje Crime News : अतिक्रमण हटविताना महापालिका अधिकाऱ्यास मारहाण

यमुनानगर चे रहिवासी दिनेश कुलकर्णी यांनी दिलेल्या माहिती नुसार 3 शाळेची मुलांनी शोभयात्रेमध्ये सहभाग घेतला होता. या मध्ये निगडीच्या मॉडर्न हाई स्कूल, एसपीएम स्कूल आणि शिवभूमी हाय स्कूल, या शाळा सहभागी होत्या. परिसरातील सर्व मंदिरांच्या समोरून ही शोभयात्रा गेली. दिनेश कुलकर्णी म्हणाले की आमच्या इथे कोणतेही राजकीय, जात, धर्माचा भेदभाव न होता शोभयात्रा केली जाते.

 

 

 

शोभयात्रेमध्ये इस्कॉन संस्थेचे रथ वापरले गेले होते. शुभ यात्रेच्या निमित्ताने बऱ्याच कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये ढोलपथक, विविध प्रांतातल्या विविध वेशभूषा, घोडेस्वार होण्याचा कार्यक्रम ठेवला होता. यमुनानगर, निगडी (Nigdi News) येथे किर्लोस्कर कॉलनी येथून शोभयात्रेचा प्रारंभ झाले. सद्गुरू दत्त मंदिरच्या इथे शोभ यात्रा संपली. साधारण सकाळी 9 च्या दरम्यान शोभयात्रा समाप्त झाली.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.