Nigdi News : पालकांनी वेळीच जागे होऊन आपल्या मुलांकडे लक्ष देणे आवश्यक – कृष्ण प्रकाश

एमपीसी न्यूज – मुलांशी पालकांनी समन्वय साधत त्यांना चांगले संस्कार देऊन समाजात एक जबाबदार नागरिक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुलांची शक्ती योग्य मार्गाला लावण्यासाठी व जबाबदार आणि सज्ञान नागरिक बनावेत यासाठी सामाजिक संस्था व बालकल्याण प्रतिनिधी यांनी पुढाकार घेतला पाहिजे असे मत पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले.

रेवांशी ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था, टॉक टू मी व विलास जावडेकर डेव्हलपर्स यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत आयोजित ‘विधीसंघर्षीत बालकांचे समुपदेशन’ या बाल अपराधींच्या पुनर्वसनाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पिंपरी चिंचवड येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे रसिकलाल धारिवाल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे या चार दिवसीय समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यात पिंपरी चिंचवड मधील 18 पोलीस स्थानकांअंतर्गत 234 बाल्गुन्हेगारांचे समुपदेशन, कल चाचणी, मानसिक चाचणी करण्यात येणार आहे.

कृष्णप्रकाश पुढे म्हणाले, झोपडपट्टी भागात राहणारे बहूतांश मुलं झटपट पैसे मिळविण्याचे मार्गावर जाताना दिसतात. कमी कालावधीत जास्त पैसे कसे मिळवता येतील या दृष्टिकोनातून ते गैरमार्ग अवलंबतात नकळत त्यांच्या हातून एखादा गुन्हा घडतो. यामुळे समाजात अशा मुलांकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोण बदलतो. वेळीच मुलांना योग्य मार्गदर्शन व समुपदेशन न-मिळाल्यास अशी बालके कायमस्वरूपी गुन्हेगार होताना दिसतात. या बालकांकडे सर्वप्रथम पालकांनी लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

झोपडपट्टी भागात जावून याचे नेमके मुळ ओळखून अशा बालकांना सामान्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे समुपदेशन व मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. पिंपरी चिंचवड शहर औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते शहरातील अनेक औद्योगकि संस्था आपल्याला रोजगार देण्यासाठी पुढाकार घेऊन तयार आहेत तसेच महाराष्ट्र उद्योजगता विकास केंद्र यांचे माध्यमातुन व्यावसायीक होण्याची संधी आहे. याचा सर्वांनी फायदा घ्यावा असे अवाहन त्यांनी उपस्थित सर्व मुलांना केले.

मानसोपचार तज्ञ डॉ. राजीव नगरकर यांनी मनाची व्यायाम शाळा या उपक्रमातून टाळ्या वाजवून मनाची खोली कशी मोजावी तसेच मित्र कोणाला म्हणायचे हेच अनेकांना कळत नाही तर योग्य पर्याय निवडता आला पाहिजे. पोलीस आयुक्त हे पालकांप्रमानेच आपलेसाठी काम करत आहेत समाजात आपली खरी ओळख मिळणे व समजणे आवश्यक आहे. तसेच ती जाणिव होणेही गरजेचे आहे या उपक्रमात आपल्या सर्वाची मनापासून साथ मिळावी असे अवाहन यावेळी बोलताना केले.

नोकरी मागणाऱ्यापेक्षा अजून चार लोकांना नोकरी देणारे बनण्याच्या दृष्टीने विचार करावा. कोणताही व्यवसाय फळास येण्यासाठी संयम ठेवून स्वतःला 15 वर्षांचा काळ द्यायला हवा असे मत सर्वेश जावडेकर यांनी मांडले. डॉ. कंजीर यांनी यावेळी आपले मत मांडले, ते म्हणाले, कोणत्याही कृतीमागे काही कारणे आसतात, काहीतरी काहाणी असते. ती समजून घेतली तरच त्या गुन्ह्याच्या मुळाशी पोहचू शकतो. या कार्यशाळेत आम्ही प्रत्येकाशी वैयक्तिकरित्या संवाद साधून ते समजून घेऊन त्यानुसार त्यांचे समुपदेशन करणार आहोत. या कार्यशाळेतून वाट चुकलेल्या मुलांचे पुनर्वसन करत त्यांना नोकरीसाठी किंवा व्यवसाय सुरु करण्यासाठी सर्व मदत पुरवली जाईल असे कंजीर म्हणाले.

या कार्यक्रमाला परिमंडळ-1 चे उपायुक्त मंचक इप्पर, परिमंडळ-2 चे उपायुक्त आनंद भोईटे, विलास जावडेकर डेव्हलपर्सचे सर्वेश जावडेकर, रेवांशी ग्रामविकास बहुउद्देशीय संस्थेचे सचिन कुंदोजवार, कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे रसिकलाल धारिवाल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक प्राचार्य भरत कासार, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नरेंद्र कंजीर आदी उपस्थित होते. सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.