Nigdi News : प्राधिकरण-पीएमआरडीए महिला कर्मचाऱ्यांचे मनोमिलन हळदीकुंकू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) या संस्थेतील महिला कर्मचा-यांनी मनोमिलन हळदीकुंकू उपक्रम साजरा केला. यावेळी नेहमीच्या कार्यालयीन कामाऐवजी महिलांनी एकमेकींना हळदीकुंकू लावून सौभाग्याचे वाण दिले.

आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळील कार्यालयात शुक्रवारी (दि.05) हा कार्यक्रम पार पडला.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी पीएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्त कविता द्विवेदी, ‘पीसीएनटीडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांच्या पत्नी सविता गवळी, अतिरिक्त आयुक्त स्नेहल बर्गे, उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग, मनिषा कुंभार, सिंधू नायर, रिनाज पठाण, शिल्पा करमरकर, आशाराणी पाटील, तहसीलदार गीता गायकवाड, लेखाधिकारी दीपाली बोऱ्हाडे आदींसह दोन्ही संस्थांमधून कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी यांची या कार्यक्रमात उपस्थिती होती.

यावेळी अतिरिक्त महानगर आयुक्त कविता द्विवेदी म्हणाले, ‘सण-समारंभातून आपल्या संस्कृती अन् परंपरांचे जतन होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून दोन्ही संस्थांमधून कार्यरत असलेल्या महिलांनी एकत्र येऊन आपल्या दैनंदिन चाकोरी बाहेरील सुख-दु:खांची देवाणघेवाण केली आणि मनोमिलन साधून आनंद, ऊर्जा मिळवली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.