Nigdi News : ‘आयआयसीएमआर’ची प्रीती ननावरे विद्यापीठात सहावी

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘एमसीए’च्या अंतिम परीक्षेत प्रीती ननावरे हिने विद्यापीठात सहावा क्रमांक पटकावला आहे. निगडी येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल अँड कम्प्युटर मॅनेजमेंट अँड रीसर्च (आयआयसीएमआर) या महाविद्यालयात ती शिक्षण घेत होती.

महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. दीपाली सवाई, एमसीए विभाग प्रमुख रेणू मॅथ्यू आणि सर्व स्टाफच्या वतीने प्रीतीचे कौतुक करण्यात आले आहे.

कौतुकाला उत्तर देताना प्रीती म्हणाली की, हे यश फक्त माझे नसून, महाविद्यालयातील माझ्या सर्व शिक्षकांचे आहे. मी स्वतःला भाग्यवान समजते की मला या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. महाविद्यालयाने मला घडवलं. आता माझं पूर्ण आयुष्य बदलून गेले आहे. महाविद्यालयाच्या कॅम्पस प्लेसमेंटमधून नुकतीच तिला ‘अलोहा’ या कंपनीत नोकरी मिळाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.