Nigdi News: ‘सेक्टर 22 मधील वंचित लाभार्थांना पंतप्रधान आवास योजनेत मोफत घरे द्या’

शिवसेना निगडी शाखाप्रमुख अरुण जोगदंड यांची महापौर आणि आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज – निगडी, सेक्टर 22 येथील वंचित लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेत मोफत घरे देण्याची आग्रही मागणी निगडी शिवसेना शाखाप्रमुख अरुण जोगदंड यांनी केली आहे.

याबाबत महापौर उषा ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात जोगदंड यांनी म्हटले की, “पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जेएनयुआरएम अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन गृहप्रकल्प राबविण्यात आला होता.

या गृहप्रकल्पात एकूण 147 इमारतीमध्ये 11760 सदनिकेचा प्रस्ताव होता. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जागेवरील जुन्या इमारती पाडून तेथील नागरीकांना नवीन घराचे स्वप्न दाखवत हा प्रकल्प उभा करण्यास सुरवात केली.

परंतु, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रेड झोनच्या हद्दीची माहीती न घेता राहत्या घरातून बेघर करत लोकांना आज खुरावड्यात राहण्यास भाग पाडले. यातील काही इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन देखील अद्यापही काही लाभार्थांना घरापासून वंचित राहावे लागत आहे.

यामध्ये सामान्य नागरीकांची कोणतीही चुक नसताना आज त्यांना असहय्य त्रास सहन करावा लागत आहे. तरी देखील लाभार्थी प्रशासनाला अत्यंत संयमाने सहकार्य करत आहेत. परंतु, आता नागरीकांचा संयम सुटला आहे.

या प्रकल्पात सदनिका वाटप करणे, न्यायालयीन आदेशामुळे शक्य नसेल तर महापालिकेने पंतप्रधान योजने अंतर्गत या नागरीकांना विनाशर्त मोफत घर देण्यात यावीत; अन्यथा शिवसेनेच्या वतीने महापालिकेवर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जोगदंड यांनी निवेदनात दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.