Nigdi News : ‘रानजाई’मुळे लहानपणापासूनच मुलांना निसर्गाविषयी गोडी निर्माण होईल – अभिनेत्री प्रार्थना बेहरे

एमपीसी न्यूज – रानजाई प्रदर्शनाच्या निमित्ताने नागरिकांना (Nigdi News) तसेच लहानपणापासूनच मुलांना निसर्गाविषयी गोडी निर्माण होण्यास आणि त्यातूनच पर्यावरणाचे रक्षण करण्याची आवड निर्माण होईल, असे मत अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने रानजाई महोत्सव रंग, गंध सृजनाचा 26 वे फुले, फळे, भाज्या बागा, वृक्षारोपण स्पर्धा व प्रदर्शनचे आयोजन 10 ते 12 मार्च मार्च 2013 दरम्यान नियोजित महापौर निवासस्थान जागा, से.नं. 27 नं. अ संत तुकाराम उद्यान शेजारी, निगडी प्राधिकरण येथे करण्यात आले आहे.

महोत्सवाच्या पहिला दिवशी संध्याकाळी ‘मियावाकी’ या विषयावर ग्रीन यात्रा कंपनीचे प्रदीप त्रिपाठी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

प्रसिद्ध सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या उपस्थितीत नागरिकांनी स्वच्छतेची शपथ घेतली. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना प्रार्थना बेहरे म्हणाल्या, अशा स्वरूपाचे भव्य प्रदर्शन भरवणारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने नागरिकांना तसेच लहानपणापासूनच मुलांना निसर्गाविषयी गोडी निर्माण होण्यास आणि त्यातूनच पर्यावरणाचे रक्षण करण्याची आवड निर्माण होईल. इतर महानगरपालिकांनी देखील अशा स्वरूपाचे कार्यक्रमांचे आयोजन करून पर्यावरण विषयक जागृती केल्यास महाराष्ट्र (Nigdi News) राज्य हरित व प्रदूषणमुक्त राज्य होण्यास वेळ लागणार नाही.

पिंपरी चिंचवड महापालिका आपल्या शहरात स्वच्छता राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम करत असून सर्व नागरिकांनी देखील या स्वच्छतेच्या मोहिमेत कचरा विलगीकरण करून आपले योगदान द्यावे आणि आपले शहर हे सर्वांनी मिळून स्वच्छ कसे बनेल यासाठी काम करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी नागरिकांना केले.

तत्पूर्वी आर जे अक्षय यांच्या फन फेअर व पर्यावरण विषयक प्रश्नमंजुषा कार्यक्रमामध्ये लहान मुलांनी तसेच उपस्थितांनी सहभागी मनोरंजना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. विविध खेळांमधील तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना आर.जे. अक्षयद्वारे पारितोषिके देण्यात आली. यावेळी उप आयुक्त सुभाष इंगळे रविकिरण घोडके, विठ्ठल जोशी, बाळासाहेब खांडेकर आदी उपस्थित होते.

Interview with Anna Bodade : मला काही सांगायचंय – भाग 12 : हॉटेल बॉय, नाईट वॉचमन ते सहायक आयुक्त!

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती. विविध फुलांच्या रंगबेरंगी जाती तसेच फुलांची, रोपांची आकर्षक मांडणी नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरित आहेत. वेस्ट टू वंडर अंतर्गत तयार करण्यात आलेली शिल्पे पाहण्यासाठी तसेच 360° सेल्फी काढण्यासाठी नागरिक विशेष गर्दी करीत आहेत. प्रसिद्ध आर्टिस्ट अजय लोळगे यांचे कॅनव्हास पेंटींगवर नागरिक देखील उत्साहाने आपल्या हाताचे ठसे उमटवून महोत्सवाला हजेरी लावीत आहेत.

रानजाई महोत्सव कुटुंबातील प्रत्येकासाठी असून लहान मुलांसाठी देखील चार्ली चॅप्लिन, जग्लर्स, फन फेअर इ. चे आयोजन करण्यात आले असल्याने नागरिकांनी महोत्सवाला नक्की भेट द्यावी असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.