Nigdi News: निवृत्त कृषी अधिकारी गजानन तुकाराम गोसावी यांचे निधन

एमपीसी न्यूज – बार्शी तालुक्यातील वैरागचे रहिवासी व निवृत्त कृषी अधिकारी गजानन तुकाराम गोसावी (वय 85) यांचे काल (मंगळवारी) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रिलायन्स एन्टरप्राईजेस कंपनीचे फिल्ड ऑफिसर अविनाश गोसावी व पत्रकार प्रसाद गोसावी यांचे ते वडील तर एमपीसी न्यूजचे संपादक विवेक इनामदार यांचे ते सासरे होत.

_MPC_DIR_MPU_II

कृषी खात्यात कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक व कृषी अधिकारी अशा पदांवर त्यांनी कोकण विभाग तसेच पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यात प्रदीर्घ सेवा केली. सेवानिवृत्तीनंतर ते वैराग येथे वास्तव्याला होते. प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची ख्याती होती.

गेले काही महिने प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांच्यावर पिंपरी-चिंचवडमधील लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान काल दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.