Nigdi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सफाई कामगारांचा सत्कार, मास्क, हँडग्लोजचे वाटप

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे उपाध्यक्ष समीर जावळकर यांच्या वतीने सफाई कामगार, पोलीस नागरिक मित्र यांचा सत्कार करण्यात आला. गुलाबाची फुले, फळे, मास्क व हँडग्लोजचे वाटप करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा समर्पण सप्ताह आयोजित केला आहे. त्याअंतर्गत विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पिंपरी-चिंचवड भाजपचे शहर उपाध्यक्ष समीर जावळकर यांच्या वतीने निगडी, प्राधिकरणात विविध कार्यक्रम घेण्यात आले.

सफाई कर्मचारी, पोलीस नागरिक मित्र यांचा सत्कार करण्यात आला. सफाईचे काम करणा-या महिलांना सुरक्षिततेसाठी हँडग्लोजचे वाटप करण्यात आले. तसेच मास्कही देण्यात आले.

या सफाई कर्मचा-यांमुळे शहर स्वच्छ आणि सुंदर राहते. कोरोना काळातही त्यांनी स्वच्छतेचे काम केले. त्यांच्या कार्याचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे, असे उपाध्यक्ष समीर जावळकर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.