Nigdi News : पन्नास फूट उंचीच्या झाडावर अडकलेल्या घारीची सुखरूप सुटका

एमपीसी न्यूज – पन्नास फूट उंचीच्या झाडावर अडकलेल्या घारीची पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. आज (रविवारी, दि. 31) साडेबाराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली व त्यानंतर ब्रान्टो लिफ्टच्या सहाय्याने काही मिनिटांत घारीची सुखरूप सुटका करण्यात आली.

प्राधिकरण येथील उपअग्निशामक केंद्राच्या फायरमन भरत फाळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंट अँड्रुज स्कूलजवळ काळभोरनगर, एमआयडीसी चिंचवड येथील झाडावर एक पक्षी अडकला असल्याची माहिती प्राधिकरण उपअग्निशामक केंद्रास आज दुपारी साडेबाराच्या सुमारास मिळाली. अग्निशामक दलाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र तो पक्षी झाडावर 50 ते 55 फूटावर अडकला असल्याचे दिसून आले.

_MPC_DIR_MPU_II

घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या पथकाने वल्लभनगर मुख्य अग्निशामक केंद्रातून ब्रान्टो स्काय लिफ्ट बोलावून घेतली. त्यानंतर अग्निशामक दलाचे पथक 55 मीटर उंचीच्या शिडीतून घार अडकलेल्या ठिकाणी पोचले. जवानांनी काही मिनिटात घारीची सुटका केली.

ही कामगिरी अग्निशामक दलाचे अधिकारी प्रताप चव्हाण, वाहन चालक नितीन कोकरे, विशाल फडतरे फायरमॅन संतोष सरोटे, भूषण येवले, पंकज येडके, अभिजीत घाडगे, ऋषिकेश येवले यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.