Nigdi News: ‘सत्यम ज्वेलर्स’च्या नववर्ष कॅलेंडरचे भव्य प्रकाशन

एमपीसी न्यूज – ग्राहकांच्या सर्व आवडी-निवडी, सोयी सुविधांकडे बारकाईने लक्ष देणारे पिंपरी-चिंचवड शहरातील निगडीमधील सत्यम ज्वेलर्स होय…सत्यम ज्वेलर्सने यंदा नवीनवर्षाचे स्वागत खरेदी मुहूर्त, राशींची रत्ने, रुद्राक्ष, भरपूर प्रकारच्या ज्वेलरीची माहिती असलेल्या कॅलेंडरचे भव्य प्रकाशन आणि ‘अप्सरा अॅन्टीक वेडींग ज्वेलरी कलेक्शन सादर करुन केले.

स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा, विद्यमान नगरसेविका सुमनताई पवळे, माजी उपमहापौर, विद्यमान नगरसेविका शैलजाताई मोरे, नगरसेविका कमलताई घोलप,नगरसेविका शर्मिलाताई बाबर, शिवसेना नेत्या सरिताताई साने तसेच सत्यम ज्वेलर्सचे एमडी किरणराज चोपडा या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कॅलेंडरचे भव्य प्रकाशन करण्यात आले. उपस्थितांना कॅलेंडर आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

दैनंदिन जीवनात उपयोगी पडणा-या महत्वाच्या तारखा आणि उत्तम योग हे नेहमी ग्राहकांच्या समक्ष राहून त्यांना रीतसर त्या मुहूर्ताचे नियोजन करता यावे हे उदिष्ट ठेवून कॅलेंडर प्रकाशित केले. भविष्यातही अशाच नवनवीन उपक्रमाने आम्ही ग्राहकांशी जोडून घेण्याचा प्रयत्न करु असे एमडी किरणराज चोपडा यांनी सांगितले.

या कॅलेंडरमध्ये ग्राहकांना विविध शुभ योग, खरेदी मुहूर्त, राशींची रत्ने, रुद्राक्ष, भरपूर प्रकारच्या ज्वेलरी तसेच सणांची सविस्तर माहिती उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सत्यम ज्वेलर्सकडे अस्सल सोने आणि चांदीच्या आभूषणांची विविध रेंज मिळते. सत्यम ज्वेलर्सने तत्पर सेवा आणि उत्कृष्ट दर्जा याद्वारे ग्राहकांची पसंती मिळविली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.