Nigdi News : भक्ती शक्ती उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी दुसऱ्यांदा आंदोलन

एमपीसीन्यूज : निगडी येथील भक्ती शक्ती उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी भाजप युवा मोर्चाच्यावतीने निगडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, याच मागणीसाठी केलेले हे दुसरे आंदोलन होते. 

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष सचिन काळभोर यांच्या नेतृत्वाखाली भक्ती शक्ती उडाणपुलाजवळील प्राधिकरण पोलिस चौकी समोर आज, गुरुवारी हे आंदोलन करण्यात आले.

उड्डाणपुलाच्या उदघाटनाला दिरंगाई होत असल्याने वाहनचालकांना अडीच ते तीन किलोमीटर वळसा घालून जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विनाकारण नागरिकांना वेठीस का धरले जाते, असा सवाल करीत या उड्डाणपुलाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले असून काही राजकीय नेत्यांच्या हट्टासाठी हा उड्डाणपूल नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करण्यात येत नसल्याचा आरोप युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष सचिन काळभोर यांनी केला.

_MPC_DIR_MPU_II

तसेच यापूर्वीसुद्धा उड्डाणपूल वाहतुकीसाठी लवकरात लवकर चालू करण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते याची आठवण करुन देत महानगरपालिका आयुक्तांनी याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन हा उड्डाणपूल त्वरित चालू करावा, अशी मागणी काळभोर यांनी यावेळी केली.

सचिन शिंदे, स्वप्निल पवार, भारत पवार, संजय कहार, पिटटू लोंढे ,विकास कांबळे, पप्पू बोंडे, जावेद शेख, रझाक शेख, सागर मोरे, सागर बोराडे, नवनाथ लांडे, पप्पू हातागळे, जयदेव भुवड, फुआराम चौधरी, जगदीश चौधरी, गौरव रोदाळे, अक्षय सावंत, रमेश वाघमारे आदींनी या आंदोलनात  सहभाग घेतला.

दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.