Nigdi News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध निर्माण करून तिला एका लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिचे अश्लील फोटो काढले. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी लग्नाला विरोध केला असता तरुणाने फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. ही घटना सन 2021 ते 12 मे 2022 या कालावधीत निगडी येथे घडली.

अनिकेत प्रल्हाद पारवे (वय 22, रा. अजंठानगर, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीसोबत असलेल्या ओळखीचा फायदा घेऊन तिच्यासोबत मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध केले. तिच्यासोबत लग्न करतो असे म्हणून तिला एका लॉजवर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. मुलीचे अश्लील फोटो काढले. त्यानंतर तरुणाने मुलीच्या घरच्यांकडे येऊन मुलीसोबत लग्न करण्याची मागणी घातली. त्यासाठी मुलीच्या घरच्यांनी नकार दिला. त्यावरून आरोपीने पिडीत मुलगी आणि तिच्या घरच्यांना शिवीगाळ केली व पिडीत मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.