Nigdi News: निगडीतील सोनालीची अमेरिका येथील उच्च शिक्षणासाठी निवड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडच्या सेक्टर 22, यमुनानगर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमध्ये राहणा-या सोनाली उबाळे हिला केंद्र शासनाकडून नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशीप टू शेड्यूल कास्ट या योजनेअंतर्गत नॉर्थइस्टर्न युनिव्हर्सिटी ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे मास्टर्स ऑफ सायन्स इन गेम सायन्स अँड डिझाईन या दोन वर्षांच्या शिक्षणासाठी येणा-या 1 कोटी 20 लाख खर्चाकरीता शिष्यवृत्ती नुकतीच जाहीर झाली आहे. त्याबद्दल महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.

उपमहापौर हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, मनसे गटनेते सचिन चिखले, सोनालीचे वडील हरीभाऊ उबाळे आई रंजना उबाळे, सामाजिक कार्यकर्ते प्रबुध्द कांबळे, अभिजित गिरी, दिग्विजय सवाई, सुलतान तांबोळी आदी उपस्थित होते.

महापौर माई ढोरे म्हणाल्या, पिंपरी-चिंचवड शहराचा नावलौकीक वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील खेळाडू, विद्यार्थी, नागरिक मोठ्या प्रमाणात दैदिप्यमान कामगिरी करीत आहेत. त्यामुळे शहराच्या गुणवत्तेत निश्चितच वाढ होत असून ही अभिमानास्पद बाब आहे. असे सोनाली उबाळे हिचे पालक, शिक्षक आणि त्या भागातील लोकप्रतिनिधींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

सोनाली उबाळे पुढील आठवड्यात शिक्षणासाठी अमेरिकेस रवाना होणार आहे, अशी माहिती तिच्या पालकांनी दिली.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.