Nigdi News: ‘एसआरए’चा दुर्गानगर, शरदनगर येथील झोपडपट्टीचा सर्व्हे बनावट – मनोज गायकवाड

एमपीसी न्यूज – निगडीतील दुर्गानगर व शरदनगर या (Nigdi News) दोन झोपडपट्ट्यांचे पुनर्वसनाचे काम झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणामार्फत (एसआरए) पूर्ण करण्यात आले आहे. सर्व्हेचे काम ज्या संस्थेला दिले होते. त्या संस्थेच्या पर्यवेक्षकांनी अतिशय बनावट व चुकीचा सर्व्हे केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मनोज गायकवाड यांनी केला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गायकवाड यांनी म्हटले आहे की, माहिती अधिकार घरांची माहिती मिळाली असता त्यामध्ये काही धक्कादायक नोंदी मिळाल्या आहेत. ज्या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्या व्यक्तींच्या नावे खरेदीखत बनवून दुर्गानगरच्या बाहेरील व्यक्तींच्या नावे घराची नोंद केली. त्या व्यक्तींना पात्र केले. घरांची नोंद लावण्यासाठी आणि अपात्र व्यक्तींना पात्र करण्यासाठी आर्थिक उलाढाल झाल्याची शक्यता आहे.

Pimpri News : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा पोटनिवडणुकीत अपक्षाला पाठिंबा नाही – सचिन कुलकर्णी

मूळ झोपडीमालकाला वगळून त्यांच्या झोपडीच्या आधारे बाहेरील व्यक्तींची (Nigdi News) नोंद केली. त्यांना पात्र केले आहे. खोटी कागदपत्रे सादर करुन शासनाची फसवणूक केली आहे. ज्या संस्थेने सर्व्हेचे कामकाज केले. त्यांच्यासोबत स्थानिक माजी नगरसेवकांचे कार्यकर्ते होते. कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार हा सर्व्हे झाला आहे. खोटी कागदपत्रे सादर करुन प्राधिकरणाची दिशाभूल केल्यामुळे फौजदारी कारवाई करावी. सर्व्हे पुन्हा घेण्यात यावा. कागदपत्रांची फेरतपासणी करावी. मूळ झोपडीधारकांना न्याय द्यावा, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.