Nigdi News : ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्रात रविवारी वा. ना. अभ्यंकर यांची श्रद्धांजली सभा

एमपीसी न्यूज – ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राचे संस्थापक आणि मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे कार्यवाह ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वा. ना. तथा भाऊ अभ्यंकर (वय 79) यांचे 16 फेब्रुवारी रोजी निधन झाले. ज्ञानप्रबोधिनी निगडी येथे रविवारी (दि. 21) श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्र येथील मनोहर सभागृहात रविवारी दुपारी चार ते सायंकाळी सात या कालावधीत ही श्रद्धांजली सभा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सभा केवळ निमंत्रितांसाठी आहे. अन्य हितचिंतक, माजी विद्यार्थ्यांना दूरस्थ पद्धतीने सहभागी होता येईल. https://youtube.com/c/JPNVNigdi या लिंकद्वारे ऑनलाईन माध्यमातून सर्वांना सहभागी होता येईल, असे ज्ञानप्रबोधिनी केंद्राच्या वतीने सांगण्यात आले आहे.

पंचकोषांवर आधारित शिक्षणपद्धती विकसित करण्यात अभ्यंकर भाऊंचा मोठा सहभाग होता. विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगभूत गुणांची जाणीव व्हावी आणि त्यांनी सुजाण नागरिक व्हावे, यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट घेतले. गणित, संस्कृत या विषयांत त्यांचा हातखंडा होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.