Nigdi News: स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे रविवारी इ-कचरा, प्लॅस्टिक कचरा संकलन मोहिम

एमपीसी न्यूज – निगडी, प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निसर्ग मित्र विभाग आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – पर्यावरण गतिविधी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.15) सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत विविध ठिकाणी इ-कचरा व प्लॅस्टिक कचरा संकलन मोहीम आयोजित केली आहे.

संत ज्ञानेश्वर चौक ( भेळ चौक), अ प्रभाग कार्यालयासमोर, प्राधिकरण, निगडी येथे मोहिम राबविण्यात येणार आहे. इ-कचरा व प्लॅस्टिक कचरा जमा करण्यासाठी मनेश म्हस्के 7709007292 आणि दीपक पंडित 9561096541 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

ओरिएन्टल मार्वल सोसायटी, A7, 1, काकडे पार्क रोड, केशव नगर, चिंचवड येथे इ-कचरा जमा करण्यासाठी योगेश लंके 9325103677, राजन पाटील 9822552433, इरो किड्स प्रि स्कुल साई श्रध्दा अपार्टमेंट, मस्टर्ड मार्ट जवळ, भोंडवे सर्कल, सेक्टर 29, रावेत येथे अभिजित बाबर – 8888814075 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

भास्कर रिकामे समन्वय साधत असून पुर्णम इकोव्हिजन यांचे विशेष सहकार्य आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.