Nigdi News: स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ ग्रामीण ग्रंथालयांना पुस्तकरुपी मदत करणार

एमपीसी न्यूज – निगडी, प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या रवींद्रनाथ ठाकूर ग्रंथालयाच्या वर्धापनदिनानिमित्त ग्रामीण भागातील गरजू ग्रंथालयांना पुस्तकरुपी मदत केली जाणार आहे.

निगडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालयाचा 37 वा वर्धापनदिन 14 फेब्रुवारी 2021 रोजी संपन्न होत आहे.

वर्धापनदिनाच्या निमित्ताने ग्रंथालयाच्या वतीने दरवर्षी ग्रामीण भागापर्यंत वाचन संस्कृती पोहचवण्यासाठी दोन गरजू ग्रंथालयांना पुस्तकांच्या रूपाने मदत केली जाते.

यावर्षी देखील पुणे ग्रामीण भागातील दोन ग्रंथालयांना पुस्तकाच्या रूपाने मदत करण्याचे ठरविले आहे.

मदत हवी असणाऱ्या ग्रंथालयांनी ग्रंथालय कार्यवाह प्रदीप पाटील यांच्याशी 9822604751 या मोबाईलवर किंवा प्रत्यक्ष ग्रंथालयात संपर्क करण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.