Nigdi news: स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे किल्ले बनवा स्पर्धा

एमपीसी न्यूज – निगडी, प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पण दरवर्षी प्रत्यक्ष मैदानावर किंवा घरोघरी जाऊन परीक्षण करून होणारी किल्ले बनवा स्पर्धा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या स्वरूपात घेतली जाणार आहे.

किल्ले आपापल्या घरीच बनवायचे आहेत. ( कार्यक्षेत्र मर्यादा नाही.) किल्ला बनवताना तो काल्पनिक न बनवता स्वतः भेट दिलेल्या व मनाला भावलेल्या महाराष्ट्रातील किंवा अन्य राज्यातील एखाद्या किल्ल्याची प्रतिकृती बनवावी. किल्ल्यासाठी पर्यावरण पुरक साहित्य वापरावे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 12 नोव्हेंबर 2020 पर्यंत मंडळाच्या रविंद्रनाथ ठाकूर ग्रंथालयात (सकाळी 10 ते सायंकाळी 6 यावेळेत) नाव नोंदणी करावी.

यावर्षी किल्ल्यांचे परिक्षण पारंपरिक पध्दतीने प्रत्यक्ष घरी येऊन केले जाणार नाही त्याऐवजी स्पर्धकांनी तयार केलेल्या किल्ल्याच्या प्रतिकृतीचे तिन वेगवेगळ्या बाजूंनी काढलेले तिन फोटो व जास्तीत जास्त दोन मिनिटांचा किल्ल्याची माहिती सांगणारा व्हीडीओ 18 नोव्हेंबर 2020 पर्यंत व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावा.

किल्ल्याचा फोटो काढताना त्यामध्ये स्पर्धक उभा राहीलेला असावा. म्हणजे किल्ल्याचा आकार लक्षात येईल. व्हिडिओमध्ये आजच्या युगात किल्ल्यांचे महत्व का वाटते आणि त्याच्या संवर्धनासाठी सरकारी पातळीवर आणि युवक म्हणून काय करावे असे तुम्हांला वाटते हे नमूद करावे. या फोटो व व्हिडीओचे परिक्षण करुन पहिल्या तिन क्रमांकांना 1 हजार, 750 आणि 500 रुपये,  पुस्तकरुपात) बक्षीसे दिली जातील. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना Digital Certificate पाठवली जातील.

स्पर्धेत समान गुण मिळवणाऱ्या स्पर्धकांना बक्षिस विभागून दिले जाईल. परिपुर्ण व्हिडीओ youtube वर Upload केले जातील (यासाठी परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील) नोदणी तसेच फोटो व व्हिडीओ पाठविण्यासाठी  8446422965 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

किल्यांविषयी माहितीसाठी संपर्क  विनित दाते  9960472514,  शैलेश भिडे –  9922449603 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III