Nigdi News : ‘आयआयसीएमआर’चा शिक्षक पालक मेळावा

एमपीसी न्यूज – औद्योगिक तंत्र शिक्षण संस्थेच्या इन्स्टिटयूट ऑफ इंडस्ट्रियल अँड कॉम्प्युटर मॅनॅजमेन्ट अँड रिसर्च, निगडी येथे शनिवारी (दि.23) शिक्षक पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. एमसीए डायरेक्टर डॉ. दीपाली सवाई यांच्या मार्गदर्शनाखाली एमसीएच्या विद्यार्थ्यांसाठी या शिक्षक पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी एमसीए द्वितीय व तृतीय वर्षाचे पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि विभाग प्रमुख रेणू मॅथ्यू सहभागी झाले होते.

डॉ. दीपाली सवाई यांनी संस्थात्मक उद्दिष्टे स्पष्ट करून त्याची कृती योजना सांगितली. यावेळी आयआयसीएमआरमध्ये इंटरनॅशनल सर्टिफिकेशन्ससाठी दिले जाणारे फ्री ट्रेनिंग, एम्प्लॉयबिलिटी एन्हान्समेंट प्रोग्रॅम, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग, मेन्टॉरिंग ऍक्टिव्हिटीस, ARKO क्लब विषयी माहिती देण्यात आली.

एमसीए द्वितीय व तृतीय वर्षाचे समन्वयक संजय मते आणि संजय मठपती यांनी शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. वंदना पेडणेकर यांनी ARKO उपक्रमांची माहिती दिली व विजेत्यांची नावे घोषित केली. याप्रसंगी काही पालकांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा काळंगे यांनी केले तर, डॉ. प्रिया देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.