Nigdi News : अनधिकृत बांधकाम प्रकरणी महापालिका आयुक्तांच्या घऱाबाहेर करणार थाळीनाद आंदोलन

एमपीसी न्यूज – निगडी येथील (Nigdi News) आण्णा भाऊ साठे बस स्टॉप ठिकाणी रेड झोन एरियामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत शौचालय व चार दुकान गाळा बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी कारवाई करण्यात येत नाही, म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या निवासस्थानी बुधवारी (दि.7) थाळीनाद आंदोलन करण्यात येणार आहे.

हे (Nigdi News) आंदोलन सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी पुकारले असून त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, 24 नोव्हेंबर रोजी चिचंवड येथील महापालिकेच्या स्मार्टसिटी कार्यालयाबाहेर या प्रकरणी लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. मात्र, त्याची कोणतीही दखल घेतली गेली नाही. पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटी अंतर्गत 15 वर्ष करारनामा करून विनामूल्य जागा देण्यात आली. त्या ठिकाणी रेड झोन एरियामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत बेकायदेशीर बांधकाम करून शौचालय व चार दुकान गाळा बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले.

त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. रेड झोन एरियामध्ये बेकादेशीर बांधकाम केल्याप्रकरणी सामान्य नागरिकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन कारवाईचा बडगा उगारला आहे, तर दुसरीकडे स्वतः पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन रेड झोन एरियामध्ये बेकादेशीर बांधकाम प्रकरणी पाठबळ देत आहे, असा आरोप काळभोर यांनी केला असून याविरोधात महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या निवासस्थानी बुधवारी थाळीनाद आंदोलन करुन आयुक्तांना चप्पल बूट हार भेट देण्यात येणार आहे, अशी माहिती सचिन काळभोर यांनी दिली आहे.

Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवड येथे शुक्रवारपासून रंगणार धनुर्विद्या स्पर्धा

पोलीसांनी बजावली नोटीस

मात्र, या आंदोलन प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत नोटीस बजावली असून त्यात म्हटले आहे की, 28 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र पोलीस आधिनियम 1951 चे कलम 37 (1) प्रमाणे पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात मोर्चे, आंदोलन, निदर्षने, प्रक्षोभक वक्तव्य करणे, प्रतिमेचते दहन, रास्ता रोको यांना मनाई आहे. त्यामुळे काळभोर यांना हे आंदोनल करता येणाँर नाही. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी काळभोर यांना नोटीसीद्वारे दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.