Nigdi news: निगडीत कावळे मृतावस्थेत आढळले; मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याची मागणी

एमपीसी न्यूज – निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीमध्ये मृत कावळे आढल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार यांनी केली आहे.

याबाबत खैरनार यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, अमरधाम स्मशानभूमीमध्ये शहरातील अनेक ठिकाणांहून अंत्यविधीसाठी नागरिक येत असतात. या ठिकाणी आठ ते दहा दिवसांपासून अनेक कावळे मृत्यूमुखी पडत आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

तसेच या स्मशानभूमीत अनेक कर्मचारी कामास आहेत. रोजच अशा प्रकारे कावळ्यांच्या होणाऱ्या मृत्यूमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

मृत कावळ्यांच्या संपर्कात आल्याने अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांचा व तेथील कर्मचाऱ्यांचा आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने मृतावस्थेत आढळलेल्या कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत.

तपासणी करून कावळ्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करावे तसेच वस्तूनिष्ठ माहिती द्यावी, अशी मागणी खैरनार यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.