Nigdi News : ‘दरवर्षी वाढदिवसाला बिर्यानी बनवता यावर्षी का नाही’ असे म्हणत मुलीला धारधार शस्त्राने केले जखमी

एमपीसी न्यूज – ‘दरवर्षी वाढदिवसाला बिर्यानी बनवता यावर्षी का नाही’ असे म्हणत वाढदिवस असलेल्या मुलीला धारधार शस्त्राने जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना गुरुवारी (दि.24) निगडीतील ओटास्किम येथे रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली.  

याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी राजु केराप्पा गायकवाड (वय 41, आंबेडकर वसाहत, ओटास्किम, निगडी ) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी संतोष प्रदिप गायकवाड ( वय 40, ओटास्किम, निगडी ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष गायकवाड हे फिर्यादी राजु गायकवाड यांच्या घरी फिर्यादी यांच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. आरोपी संतोष गायकवाड यांनी ‘दरवर्षी मुलीचा वाढदिवसाला बिर्यानी बनवता यावर्षी का नाही बनवली’ असे म्हणत फिर्यादी यांच्या पत्नीला शिवीगाळ केली तसेच, तलवारी सारखे दिसणा-या लोखंडी धारधार शस्त्राने फिर्यादी यांच्या पत्नीवर हल्ला केला. आईचा बचाव करण्यासाठी मध्ये आलेल्या मुलीच्या दोन्ही हातावर आरोपीने धारदार शस्त्र मारुन तिला जखमी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.