Nigdi News : गोल्डन अवर उपचाराद्वारे ब्रेन स्ट्रोकचे धोके टाळता येतील – पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश

एमपीसी न्यूज – हार्ट अ‍ॅटॅक, अपघात याविषयी लोकामध्ये जागृती आहे. पण आजही ब्रेन स्ट्रोक बाबत लोक अनभिज्ञ आहेत. गोल्डन अवरमध्ये तातडीने सेवा मिळाली तर यामुळे उपचाराअभावी होणारे कायमचे अंपगत्वासारखे दुष्परिणाम तसेच प्रसंगी उद्भवणारी जिवीतहानी टाळता येऊ शकते, असे मत पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले.

लोकमान्य हाॅस्पिटल व आयकार्डिन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य हाॅस्पिटल, निगडी येथे ‘स्ट्रोक केअर सेंटर’ सुरु करण्यात आले. सेंटरचे उद्घाटन महापौर माई ढोरे आणि पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते करण्यात आले.

बुधवारी (दि. 17) निगडी येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी माजी उपमहापौर शैलजा मोरे, लोकमान्य हाॅस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डाॅ. नरेंद्र वैद्य, आयकार्डिनचे संचालक समीर मोरे, न्युरो फिजिशियन डाॅ. अमितकुमार पांडे, डाॅ. निहार इंगळे, डाॅ. किरण नाईकनवरे, डाॅ. श्रीकृष्ण जोशी, ग्रुप सीओओ सुनिल काळे, भाजप युवा संघटनेचे अनुप मोरे उपस्थित होते.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, हे काम अत्यंत महत्वाचे असल्याने हा उपक्रम पिंपरी-चिंचवड मधील नागरिक मुख्यतः ज्येष्ठ नागरिकांसाठी फारच उपयुक्त आहे. लोकमान्यने कोविडच्या काळात केलेली गरजूंची सेवा ही खरी ईश्वरसेवा आहे. त्यांनी हा लोकसेवेचा रथ ‘चरैवती,चरैवती’ असाच चालत ठेवावा.

डॉ. नरेंद्र वैद्य म्हणाले, ‘अत्याधुनिक तंत्रज्ञान व सर्मपित डाॅक्टरांची टीम यांच्या संयुक्त प्रयत्नाने ब्रेन स्ट्रोक, इपिलेप्सी, न्युरो डिसाॅर्डर्स आदी समस्यांवर वेळीच उपचार उपलब्ध होतील. पाश्चात्य देशाप्रमाणे जागतिक स्तरावरील प्रोटोकाॅलचे पालन करुन एक उत्तम सुविधा या सेंटरच्या माध्यमाद्वारे देण्यात येईल. अपघातग्रस्तांना जशी तातडीक सेवा देऊन लाखो लोकांचे प्राण वाचविण्याचे काम केले, तसेच हे काम देखील निष्ठेने करण्यात येईल.

तोंड वाकडे होणे, हाता पायातील ताकद कमी होणे, तोतरे बोलणे, जीभ जड वाटणे, बेशुद्घ होणे अशी लक्षणे असल्यास नागरिकांनी 9822242100 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधल्यास मोफत अँम्ब्युलसची सेवा रुग्णांना उपचारासाठी देण्यात येईल, अशी माहिती डाॅ. श्रीकृष्ण जोशी यांनी दिली.

या सेंटरची संकल्पना व प्रास्ताविक सुप्रसिद्ध न्युरोफिजीशियन डाॅ. अमितकुमार पांडे यांनी केले. समीर मोरे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.