Nigdi News : टिळक चौक ते दुर्गानगर चौकापर्यंतचा रस्ता अर्बन स्ट्रीट अंतर्गत होणार विकसित

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 13 यमुनानगर भागातील लोकमान्य टिळक चौक ते दुर्गा नगर पर्यंतचा रस्ता अर्बन स्ट्रीट अंतर्गत विकसित होणार आहे. या कामाचे महापौर उषा ढोरे आणि आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते आज (शुक्रवारी) भूमिपूजन झाले.

मनसेचे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक उत्तम केंदळे, नगरसेविका सुमन पवळे, कमल घोलप, शरद इनामदार, अण्णा अडी, अप्पा कुलकर्णी, विकास देशपांडे, भगवान श्राद्धे, बापु घोलप, ए. पी. कुलकर्णी, शेखर आसरकर, गिरी देशमुख, आदित्य कुलकर्णी, प्रथमेश आंबेडकर, शिरीष जेधे , अनिल वाणी, प्रशांत बाराते, सारिका चव्हाण, विमल काळभोर, निलम गोलार उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

गेल्या अनेक वर्षापासून या कामाच्या प्रतीक्षेत आम्ही होतो. प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी वर्ग, सकाळी सकाळी मॉर्निंगसाठी जाणारा वर्ग यासाठी व्यवस्थितपणे रस्त्याने चालता यावे, सायकलिंग व्यवस्थित करता यावी, यासाठी या कामासाठी आम्ही सर्व आग्रही होतो. अर्बन स्ट्रीट या कामामुळे निगडीकडून येणारी व त्रिवेणीनगर मार्गे भोसरीकडे जाणारी वाहतुक सुरळीत होण्यास मदत होईल. सायकल ट्रॅक आणि पादचारीद्वारे जाणारे नागरिक यांना सुरक्षितपणे मार्गक्रम करता येईल.

लोकमान्य टिळक चौक ते दुर्गा नगर चौक वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होईल. पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल, असे नगरसेवक सचिन चिखले यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment