Nigdi News: ‘जे मारतील गड किल्ल्यांवर फेरफटका, त्यांना येणार नाही कधी हृदयाचा झटका’

दुर्गा टेकडीवर रंगला 'कोरोना योद्धा कृतज्ञता' सोहळा

एमपीसी न्यूज – ज्याला हृदय आहे असे मावळेच गड किल्ल्यांवर जातात. जे मारतील गड किल्ल्यांवर फेरफटका, त्यांना येणार नाही कधी हृदयाचा झटका, असे सांगत शिव व्याख्याते- लेखक प्रा. नामदेवराव जाधव यांनी गडकिल्यांवर फेरफटका मारण्याचे आवाहन केले.

‘आपला परिवार व चला मारू फेरफटका” सदस्यांनी निसर्गरम्य दुर्गा टेकडी येथे मकरसंक्रांत हा सण एकमेकांना आनंद वाटत मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी कोरोना काळात समाजासाठी विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

प्रमुख पाहुणे मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे, शिव व्याख्याते- लेखक, प्रा.नामदेवराव जाधव,वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र राजमाने, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, अनंत को-हाळे आदी उपस्थित होते.

हास्य योगाच्या माध्यमातून परिवाराच्या सदस्या शिला झांबरे यांनी सर्वांना “नको औषध,नको गोळ्या, हसता हसता वाजवा टाळ्या” हा सल्ला दिला. वैशाली आवटे यांनी भावगिताने कार्यक्रमाची सुरुवात केली. पौर्णिमा देशमुख यांनी संस्थेच्या मागील सात वर्षांपासूनचा लेखाजोखा मांडत प्रस्ताविक केले.

डॉ. श्रीखंडे, शिल्पा शिरोळे, सोमनाथ सलगर, क्षितिज देशमुख, कोमल कदम, सरला आवटे, अनिता वांजळे, बाळासाहेब राठोड, पोलीस निरीक्षक राजेंद्र राजमाने, एकनाथ लोहार, दगडू चिंचाने, वाय. डी. शिंदे, वरिष्ठ बँक व्यवस्थापिका अनिता होनराव, नवी मुंबई येथील मुख्य अधिकारी (स्वच्छता) प्रल्हाद खोसे, दिनेश कसबे, बळीराजा राजेंद्र थिगळे, महेश शिंदे, अत्यावश्यक सेवेतील गोरक्ष तिकोने, किरण कांबळे, अश्विनी बांगर, हेमलता पाटील, प्रेरणा असोसिएशन फॉर दि ब्लाइंड संस्थेचे अध्यक्ष पराग कुंकुलोळ, रोहीत खर्गे यांना कोरोना योद्धा-कृतज्ञता पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

खासदार बारणे यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. आपण आपल्या या परिवाराची ताकत सिमीत न ठेवता समाजात मोठा आदर्श निर्माण केला आहे. ही ताकद समाजासाठी,देशसेवेच्या उत्तम कार्यासाठी उपयोगात आणली पाहीजे. मी ही या परिवाराचा एक सदस्य असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी राजेश देशमुख, किरण कांबळे, अनिल शर्मा, पराग खाडीलकर, दिपक मराठे,  संदिप दरवेशी,  उद्धव वांजळे, पोर्णिमा देशमुख, प्रतिभा थोरात,  अजित भालेराव, बाळासाहेब मरळ, महेंद्र भाटलेकर, यशवंत महाजन, विजय शिर्के,संदिप दरवेशी, किरण चव्हाण, दत्तात्रय कुंभार, वामन आवटे, प्रविण जाधव, ज्योती प्रकाश, गिरीश काटे, पांडूरंग राऊत, गोरक्ष तिकोने, प्रविण जाधव,दिलीप गायकवाड, अविनाश दांगट यांनी विशेष योगदान दिले. बाळासाहेब मरळ यांनी आपल्या पहाडी आवाजात प्रेरणा गित सादर केले.

सूत्रसंचालन श्रीकांत कदम यांनी केले. या वेळी उपस्थितांनी पर्यावरणाची शपथ घेतली. शपथ वाचन प्रल्हाद खोसे यांनी केले. ‘आपला परिवार’या संस्थेचे संस्थापक एस.आर.शिंदे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.