Pimpri News: माजी महापौर मधुकर पवळे यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – माजी महापौर मधुकर पवळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, उपायुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

त्यानंतर निगडी येथील त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासही उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सहाय्यक आरोग्याधिकारी एम. एम. शिंदे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.