Nigdi News : 17 किलो गांजा जवळ बाळगणा-या दोघांना अटक

बेकायदेशीरपणे गांजा जवळ बाळगल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतले आहे.

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे गांजा जवळ बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई शुक्रवारी (दि.11) जुना मुंबई-पुणे हायवेजवळील मार्बल आणि ग्रेनाईड दुकानासमोर केली.

साहिल मुसा शेख (वय, 19) व बेबी भारत बाटुंगे (वय 52, रा. बिलाल चौक, तामापूर, ता. जि. जळगाव) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई संतोष पोपट भालेराव (वय, 32) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साहिल मुसा शेख याच्याकडे 2 लाख 38 हजार 700 रुपये किंमतीचा 9 किलो 548 ग्रॅम वजनाचा तर आरोपी बेबी भारत बाटुंगे हिच्याकडे 2 लाख 14 हजार 725 किंमतीचा 8 किलो 589 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला आहे.

बेकायदेशीरपणे गांजा जवळ बाळगल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.