Nigdi News: गृहनिर्माण सोसायट्यांचे ‘वॉटर ऑडिट’ केल्यास पाणी गळती निदर्शनास येईल – लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी 135 एलपीसीडी या मानांकाप्रमाणे पाणी वापरण्याबाबत जनजागृती करावी. शहरातील मोठ-मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांचे ‘वॉटर ऑडिट’ केल्यास पाण्याची गळती निदर्शनास येईल. त्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिल्या.

निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणीपुरवठा विभागाचा आढावा घेतला. महापौर उषा ढोरे , नगरसेवक सागर आंगोळकर , पाणीपुरवठा विभाग प्रमुख प्रविण लडकत, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक अडसुळ उपस्थित होते.

सद्यस्थितीत पिंपरी-चिंचवड शहरास एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. भविष्यात 24 तास पाणीपुरवठा करण्याच्या अनुषंगाने तसेच 24×7 योजनेअंतर्गत प्राधिकरण सेक्टर 25 येथे प्रायोगीक तत्वावर सुरु केलेल्या 24 तास पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. प्राधिकरण सेक्टर 25 येथे 24 तास पाणीपुरवठा चालू झाल्यानंतर त्यातून आलेला अनुभव, पाण्याची बचत याबाब बाबत सादरीकरण करण्यात आले.

24 x 7 योजनेअंतर्गत से.क्र. 23 निगडी पासून डांगे चौकापर्यंत नव्याने 1 हजार मिमी व्यासाची पाईप लाईन टाकण्यात आली आहे. या पाईप लाईनमुळे वाकड,थेरगाव, काळेवाडी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख आणि सांगवी इत्यादी भागांचा पाणीपुरवठा सुधारणार आहे. याशिवाय शहरात 24 x 7 योजना व अमृत योजनेअंतर्गत नागरिकांचे जुने नळ कनेक्शन बदलण्यात आले. त्याठिकाणी एमडीपीई पाईप लाईनचे कनेक्शन करणेत आले आहे. त्यामुळे पाण्याची गळती कमी होऊन पाण्याची बचतही होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.