Nigdi News : सुप्रसिद्ध ‘दख्खनी मिसळ आणि थाळी’ निगडीत ; प्राजक्ता गायकवाड व संग्राम चौगुले यांच्या हस्ते झाले उद्घाटन

एमपीसी न्यूज – निगडीतील भेळ चौकाजवळ नव्यानं सुरु झालेल्या सुप्रसिद्ध दख्खनी मिसळ आणि थाळी खाद्य दालनाचे उद्घाटन अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड व मिस्टर युनिव्हर्स संग्राम चौगुले यांच्या हस्ते झाले.

शनिवारी (दि.12) सकाळी साडे दहा वाजता हा उद्घाटन समारंभ पार पडला. जिभेवर रेंगाळणारी आणि महाराष्ट्राला जोडणारी चव अशी या मिसळची खास ओळख आहे. उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी (रविवारी) शेकडो खाद्य प्रेमींनी दख्खनी मिसळ आणि थाळीची चव चाखली.

‘मिसळ ही भेसळ नसावी तर, ती पारंपारीक आणि पुन्हा पुन्हा खावीशी वाटावी अशी असायला हवी’ या विचारावर ठाम असलेल्या सिद्धराज ग्रुपची सुपरहिट दख्खनी मिसळ आणि थाळी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी प्रसिद्ध आहे.

भोसरी आणि कात्रज मधील मिसळप्रमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर दख्खनी चव आता निगडीकरांना देखील चाखायला मिळणार आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवडकर चविष्ठ खाद्यपदार्थांच्या बाबतीत चोखंदळ आहेत. तसेच, त्यांचे मिसळप्रेमही जगजाहीर आहे. अशा खाद्यप्रेमींसाठी सुप्रसिद्ध ‘दख्खनी मिसळ आणि थाळी’ एक पर्वणीच ठरणार आहे.

निगडीतील दख्खनी मिसळ आणि थाळीची चव चाखून खाद्यप्रमेंनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चवीचे कौतुक करत समाधान व्यक्त केले. भेळ चौक फूड डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध आहे. त्यात आता दख्खनी मिसळ आणि थाळीची भर पडली आहे.

याठिकाणी पाच प्रकारच्या वेगवेगळ्या मिसळ उपलब्ध आहेत, ज्यामध्ये झणझणीत कोल्हापूरी मिसळ, खान्देशी मिसळ, कांदा-लसूण विरहीत जैन मिसळ, नाविन्यपूर्ण सात्विक दुध मिसळ तसेच, गुरूवार- शनिवार, संकष्टी, एकादशीला खास उपवास मिसळ देखील मिळणार आहे.

थाळीमध्ये व्हेज पराठा थाळी, पनीर चीज पराठा थाळी, दख्खनची थाळी, श्रावण थाळी मिळेल.

याशिवाय कट वडा, सोलकढी, केशव चहा, पुरण पोळी, उकडीचे मोदक, गाजर हालवा, दुधी हालवा, कोथिंबीर वडी, आळु वडी, गुलाबजाम, बासुंदी, हे खाद्यपदार्थ देखील मिळतील.

सिद्धराज गृपचे संचालक विनय शिंदे आणि विवेक शिंदे हे मिसळच्या पारंपारीक चवीला प्राधान्य देतात. सिद्धराज गृपने दख्खनी मिसळला अल्पावधित ‘ब्रॅन्ड’ म्हणून ओळख मिळवून दिली आहे.

येणा-या काळात पिंपरी चिंचवड परिसरात अजून फ्रॅन्चायजीच आणण्याचा त्यांचा मानस आहे.

निगडीतील ‘दख्खनी मिसळ आणि थाळी’ फ्रॅन्चायजीचे मालक केतन शिंदे म्हणाले, ‘दख्खनी मिसळ आणि थाळीला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या दख्खनी मिसळची चव चाखण्यासाठी मिसळप्रेमींनी एकदा भेळ चौकातील खाद्य दालनाला आवश्य भेट द्यावी’

खाद्य दालनाचा पत्ता –
‘दख्खनी मिसळ आणि थाळी’
आशिष प्लाझा, राधिका इलेक्ट्रॉनिक्स समोर, भेळ चौकाजवळ, निगडी
संपर्क क्रमांक – केतन शिंदे 8805504110

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.