शनिवार, ऑगस्ट 20, 2022

Nigdi News : हॉस्टेल इनचार्जकडून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – हॉस्टेल इनचार्जने हॉस्टेलमध्ये जेवण करत असलेल्या महिलेचा विनयभंग केला. हा प्रकार 29 मे रोजी रात्री साडेआठ वाजता अजंठानगर चिंचवड येथे घडला.

 

शशिकांत दीक्षित (वय 55, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजंठानगर येथे असलेल्या हॅंडीकॅप सेंटरमध्ये आरोपी हॉस्टेल इनचार्ज म्हणून काम करतो. फिर्यादी महिला संस्थेच्या डायनिंग हॉल येथे जेवण करत असताना आरोपीने फिर्यादींसोबत बोलण्याचा बहाणा करून गैरवर्तन केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.
spot_img
Latest news
Related news