Nigdi News : जुन्या भांडणातून तरुणावर कोयत्याने वार, दहा जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणातून कोयत्याने वार करत दगड व विटा मारून तरुणाला गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (दि.23) यमुनानगर येथील अपंग शाळेसमोर रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

याप्रकरणी जखमी तरुण अख्तर ऊर्फ मुन्ना जमालउद्दीन शेख (वय 21, दत्तकृपा हौसिंग सोसायटी, ओटास्किम, निगडी) याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी शाहिद शेख ( रा. अंकुश चौकाजवळील झोपडपट्टी, ओटास्किम, निगडी, पुणे) आकाश बसुराज दोडमणी (वय 24, रा. श्रीराम हौसिंग सोसायटी, ओटास्किम, निगडी, पुणे) सातलिंग सिद्धराम संगळगी (वय 18, रा. राजनगर, ओटास्किम, निगडी, पुणे ) आदेश माने, मारुती धोत्रे, ओंकार दाहिजे, भारत कांबळे (रा. दळवीनगर झोपडपट्टी, ओटास्किम, निगडी, पुणे) गणेश सिद्धराम बनसोडे (वय 16, रा. राजनगर, निगडी, पुणे ) अजय देवकर, अजय केशव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

त्यापैकी आरोपी शाहिद शेख व सातलिंग सिद्धराम संगळगी यांना अटक केली असून आरोपी गणेश सिद्धराम बनसोडे हा विधीसंघर्षित असुन त्याला देखील ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मैत्रिणी सोबत यमुनानगर येथील अपंग शाळेसमोर बोलत उभे राहिले होते. त्यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी शाहिद शेख याने त्याच्या हातातील धारदार लोखंडी कोयता फिर्यादीच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले.

आरोपी आकाश दोडमणी याने त्याचे हातातील दगड फिर्यादी यांच्या पाठीमध्ये मारला. दोन्ही आरोपींनी फिर्यादीच्या हातापाया वर लोखंडी कोयत्याने वार करून त्याला जखमी केले. इतर आरोपींनी फीर्यादीला दगड विटा मारत लाथा बुक्यानी मारहाण केली. तसेच फिर्यादी ची एमएच-14 एचएफ-8831 ही दुचाकी तोडून फोडून गाडीचे नुकसान केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.