Nigdi News : ब्राह्मण महासंघाच्या ‘मंगळागौर’ स्पर्धेत निगडीचा संस्कृती ग्रुप प्रथम

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत निगडीतील संस्कृती ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला आहे. मंगळवारी (दि. 23) प्राधिकरणात पार पडलेल्या या स्पर्धेत सहा संघांनी भाग घेतला होता. संस्कृतीचे दर्शन घडविणारी ही स्पर्धा उत्साहात पार पडली. 

खानदेश मराठा हॉलमध्ये हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला. ब्राह्मण महासंघाच्या अध्यक्षा शर्मिला महाजन यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले. तसेच, या काळात महिलांना एकत्र करून अशा पद्धतीचे कार्यक्रम केले तर संस्कृतीचे जतन होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ हा समाज एकसंघ करण्याच्या दृष्टीने काम करत आहे, याचे हे एक मोठे उदाहरण ठरू शकते. नवरात्र आणि गणपतीतही संस्कृती जतन करणारे अनेक कार्यक्रमांचे नियोजन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ करेल, असे महाजन यांनी सांगितले.

 

स्पर्धेचा निकाल 

प्रथम क्रमांक – संस्कृती ग्रुप (निगडी) 

द्वीतीय क्रमांक- रणरागिणी ग्रुप (भोसरी, इंद्रायणी नगर ) 

तृतीय क्रमांक – नवरंग ग्रुप (चिंचवड )

उत्तेजनार्थ बक्षीस (विभागून) – स्पूर्ती ग्रुप (निगडी), शालिनी ग्रुप व शिवगौरी ग्रुप  

 

‘एमपीसी न्यूज’चे अनुप घुंगुर्डे यांच्यातर्फे उत्तेजनार्थ विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.

कार्यक्रमाच्या संयोजनात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी, सदस्य यांनी सक्रिय सहभाग घेतला. वृंदा गोसावी, सुषमा वैद्य, मनीषा नातू, सचिन कुलकर्णी, संकेत कुलकर्णी, महेश बरसावडे, आनंद देशमुख, डॉ. माधवी महाजन यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

अर्चना वर्टीकर, स्मिता बेलसरे आणि माधुरी ओक यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. वृंदा गोसावी आणि मनीषा नातू यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर, महेश बारसावडे यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.