Nigdi : नृत्यकला मंदिरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या नृत्यांजली या कार्यक्रमात 120 विद्यार्थिनींच्या विविध रचना सादर

एमपीसी न्यूज- निगडी येथील नृत्यकला मंदिरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या नृत्यांजली या भरतनाट्यम नृत्याच्या विविध रचनांच्या कार्यक्रमामध्ये 120 विद्यार्थिनींनी आपले नृत्य सादर केले. मनोहर सभागृहामध्ये शुक्रवार (31 जानेवारी) रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमात भरतनाट्यम नृत्यातील विविध रचना सादर करण्यात आल्या.

यावेळी ज्येष्ठ नृत्यांगना व गुरु सुचेता चापेकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. नृत्यकला मंदिरच्या संचालिका तेजश्री अडिगे, व्ही. वाय. रतनम, लायन्स क्लबच्या अध्यक्षा सविता निंबाळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. गणेश स्तुतीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर भरतनाट्यमचा मूळ अडावूंचा पदन्यास कलावर्धिनीच्या प्रथम आणि द्वितीय वर्ष पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींनी सादर केला. त्यानंतर तिस-या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थिनींनी गणपतीच्या रुपाचे वर्णन असणारी रचना व अलारिपू ही नृत्ताची रचना तिश्र एकम तालात सादर केली. विद्येची देवता सरस्वती हिचे वर्णन करणारी माता सरस्वती ही सरस्वती रागातील आणि रुपक तालातील रचना चौथ्या वर्षाच्या विद्यार्थिनींनी सादर केली. तसेच त्यांनी जतिस्वरम ही स्वरात असणारी रचना देखील प्रस्तुत केली. पंतुवरळी रागातील आणि आदितालातील कृष्णाचे वर्णन असणारी रचना पाचव्या वर्षातील विद्यार्थिनींनी सादर केली.

मध्यांतरानंतर नृत्याची देवता असणा-या नटराजाची नटेश कौतुकम ही चतुश्र तालातील रचना डिप्लोमाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींनी सादर केली. तसेच त्यांनी तंजावरच्या शहाजीराजे भोसले यांनी लिहिलेली अद्भुत रसाची आणि खंडअट्ट तालातील शिवकीर्तनम ही रचना सादर केली. त्यानंतर जलदगती नृत्य असलेली कापी रागातील आणि आदितालातील तिल्लाना ही रचना सहाव्या वर्षात शिकणा-या विद्यार्थिनींनी सादर केली. सर्वांचे मंगल होवो अशा आशयाची मंगलम ही रचना सर्व विद्यार्थिनींनी सादर करुन उपस्थितांचे व देवाचे आभार मानले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना सुचेता चापेकर म्हणाल्या की, सतत केली जाणारी साधना आणि दृष्टीकोन यामुळे आपण आयुष्यात परिपूर्ण बनतो. उत्तम नृत्यसाधनेमुळे आनंदी व सकारात्मक जीवन जगता येते. तसेच तेजश्री अडिगे म्हणाल्या की, पिंपरी चिंचवडमधील तरुणाई आणि मुलांमध्ये अभिजात भारतीय नृत्य आणि लोकनृत्याची जाण निर्माण करण्याच्या हेतूने नृत्यकला मंदिर या संस्थेची स्थापना केली. येथील कलाकारांना चांगले व्यासपीठ मिळावे हा देखील एक हेतू आहे.

_MPC_DIR_MPU_II

नृत्यांजली या कार्यक्रमातील नृत्यांची संरचना गुरु तेजश्री अडिगे यांनी केली होती. त्यांना रुचाली बोरोले, गौरी घाडगे, अंजली औटी यांनी सहाय्य केले. साथसंगत एच. वेंकटरामन, मधू सुब्रमण्यम व संजय उपाध्ये यांनी केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनाली कानिटकर व हर्षा औटी यांनी केले. सहाय्य प्रशांत शिंदे, वैष्णवी जोशी, वीणा शिंदे, संतोष यांनी केले.

यावेळी विविध विजेत्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. त्या विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे –

प्रथम वर्ष – अन्वी भामरे, आर्या कुलकर्णी, श्रीनिधी राजगोपालन, शरयू भाकरे.
द्वितीय वर्ष – श्रेया वाळसे, अनुष्का बिश्वास, रिया कुतवळ, कीर्ती राजगोपालन.
तृतीय वर्ष – महेश्वरी जोशी, जागृती राना, शर्वरी खत्री, वेदिका जाधव.
चतुर्थ वर्ष – प्रांजल गनगनमाळे, शर्वरी जगताप, अद्विका करजगी, आर्या शिंदे, धनिष्ठा यादव.
पाचवे वर्ष – वीणा भोसले, अदिती माळी, रिया वायकोळे, अपूर्वा क्षीरसागर.
तसेच अभ्यासक्रम पूर्ण करणा-या विद्यार्थिनींची नावे पुढीलप्रमाणे – सिंथिया पवार, वैष्णवी पाटील, नित्या स्वामी, आर्या उनवणे, रेणुका काळे, जान्हवी तायडे, मैत्रेयी जोशी, हेमांगी कोठावदे, विधी पवार, अर्पिता नाटेकर, तन्वी नानोटी, ज्ञानेश्वरी साळुंके, श्रद्धा कोरे, पूर्वा झोपे, आश्लेषा चव्हाण.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.