Nigdi : खरवस विकण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेची सोनसाखळी पळविली

एमपीसी न्यूज – खरवस विकण्याच्या बहाण्याने घरात आलेल्या तिघांनी वृद्ध महिलेला विश्वासात घेऊन तिची सोनसाखळी पळविली. ही घटना गुरुवारी (दि. 27) सकाळी पावणेदहाच्या सुमारास निगडी प्राधिकरण येथे घडली.

रवींद्र गोविंद नागवेकर (वय 54, रा. निगडी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात तीन चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात तीन चोरटे गुरुवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास रवींद्र यांच्या घरी आले. चोरट्यांनी ते ‘खरवस विकण्यासाठी आले असून त्यांच्याकडे अर्धा लिटर खरवस शिल्लक आहे असा बहाणा केला. अर्धा लिटर खरवस घेऊन रवींद्र यांनी त्याच्या पैशाबाबत विचारले. ‘आम्ही पैसे घेत नसून गुळ आणि खोबरे घेतो असे चोरट्यांनी सांगितले. चोरटे रवींद्र यांच्या आईसोबत गप्पा मारत बसले. रवींद्र यांनी पत्नीला गुळ आणि खोबरे आणण्यास सांगून ते कामानिमित्त बाहेर पडले. त्यावेळी चोरट्यांनी वृद्ध महिलेकडून त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी घेतली. साखळी बघण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी पोबारा केला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.