Nigdi : नातेवाईक बोलत असल्याचे सांगून तरुणाला दीड लाखांचा ऑनलाईन गंडा

फिर्यादी यांचा साडू बोलत असल्याचे सांगून पैशांची खूप गरज असल्याचे अज्ञात व्यक्तीने फोनवर भासवले. : One and a half lakh online cheating to young man for telling relatives

एमपीसी न्यूज – नातेवाईक बोलत असल्याचे सांगून पैशांची खूप गरज असल्याचे भासवून तरुणाला दीड लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला. हा प्रकार 27 एप्रिल 2020 रोजी घडला.

प्रेमचंद देईराम गर्ग (वय 67, रा. पीसीएमटी निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 15713936557 या मोबईलधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 एप्रिल रोजी अज्ञात व्यक्तीने 15713936557 या क्रमांकावरून फिर्यादी यांच्या मुलाला फोन केला.

फिर्यादी यांचा साडू बोलत असल्याचे सांगून पैशांची खूप गरज असल्याचे अज्ञात व्यक्तीने फोनवर भासवले. त्यानंतर फिर्यादी यांच्या मुलाने अज्ञात व्यक्तीला दीड लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले.

अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या मुलाची आर्थिक फसवणूक केली असल्याचे निदर्शनास आल्याने 3 ऑगस्ट रोजी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.