Nigdi : जिवे मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत गैरवर्तन करत विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणाला निगडी पोलिसांनी अटक केली आहे.

रोहन बळीराम शिंदे (वय 20, रा. फुलेनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 19 वर्षीय तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजीनगर, चिंचवड येथे 18 ते 29 डिसेंबर दरम्यान हा प्रकार घडला. संशयित आरोपी शिंदे याने तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. मी तुला मिळवणारच, असे म्हणून मारहाण केली. तसचे जिवे मारण्याची धमकी दिली.

तरुणी तिच्या गाडीवरून जात असताना तिला अडवून आरोपीने गाडीची चावी काढून घेतली. चावीने मारहाण करून तरुणीच्या हाताला दुखापत केली. तसेच तरुणीच्या घरासमोर येऊन तिच्या पालकांना शिवीगाळ केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.