Nigdi : पूर्ववैमनस्यातून एकाला कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या रागातून एकाला कोयत्याने मारहाण केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 16) दुपारी एकच्या सुमारास ओटास्कीम निगडी येथे घडला आहे.

संजीव पेत्रस भालेराव (वय 52 रा. रुपीनगर, तळवडे) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दिपक सुरेश घडसिंग (वय 26 रा.ओटास्कीम, निगडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा भाऊ चातक भालेराव यांच्या घरी निगडी ओटास्कीम येथे गेले होते. यावेळी जुन्या भांडणाच्या रागातून आरोपी दीपक हातात कोयता घेऊन चातक यांच्याशी भांडत होता. याबाबत संजीव आरोपी दीपक याला विचारण्यासाठी गेले असता आरोपीने संजीव यांना शिवीगाळ करून लोखंडी कोयत्याने मारहाण केली. यामध्ये संजीव जखमी झाले. आरोपीने संजीव यांचा भाऊ चातक आणि त्यांच्या बायकोला देखील शिवीगाळ केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.