Nigdi : फक्त जिंकण्यासाठी नव्हे, आनंदासाठी खेळले पाहिजे – मिलिंद डांगे

एमपीसी न्यूज – फक्त जिंकण्यासाठी नव्हे, आनंदासाठी खेळले पाहिजे, विजय (Nigdi) नक्कीच मिळतो, असे मार्गदर्शन क्रीडाभारतीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष, मिलिंद डांगे यांनी निगडीमधील प्रो.ए.सोसायटीचे मॉडर्न हायस्कूल येथील  कार्यक्रमात बोलताना केले.

वार्षिक क्रीडा बक्षिस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे प्राचार्य प्रकाश पाबळे पर्यवेक्षिका, वर्षा पाचारणे व संस्थेचे आजीव सदस्य राजीव कुटे उपस्थित होते. शालेय क्रीडा स्पर्धा व अन्य स्पर्धा यामधील यशस्वी विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षक यांचा गुणगौरव मिलिंद डांगे यांचे हस्ते करण्यात आला.

मिलिंद डांगे यांनी मार्गदर्शन करताना प्रथम मुलांना प्रश्न विचारून अंतर्मुख केले. दररोज एक तासापेक्षा जास्त मोबाईल कोण कोण हाताळतात? त्याप्रमाणे दररोज एक तासापेक्षा जास्त मैदानावर कोण कोण खेळायला जातात?

पुढे ते म्हणाले, आपण नियमित ज्या सर्व गोष्टी करतो. त्याप्रमाणे नियमित शालेय अभ्यास बरोबरच मैदानी खेळ, शारीरिक व्यायाम केलाच पाहिजे, सर्वांग सुंदर व्यायाम म्हणून किमान तेरा सूर्यनमस्कार, नियमित घालावेत असा आग्रह त्यांनी सर्वांसाठी केला. त्याला योगासने प्राणायामची जोड नियमितपणे दिली गेली पाहिजे. तरच शरीर बलवान (Nigdi) होईल. देश ही निरोगी, बलवान सशक्त होईल. यावेळी लेझीम खेळाचे महत्त्व त्यांनी विषद केले.

Pimple Gurav : पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

प्रा. प्रकाश पाबळे यांनी प्रास्ताविकातून सर्व शालेय उपक्रमाची माहिती दिली. बक्षिस यादी वाचन गंगाधर सोनवणे व सुजाता ठोंबरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रशांत कुलकर्णी, तर आभार उज्ज्वला मेमाणे यांनी मानले. कार्यक्रमासाठी, शालासमिती अध्यक्ष, ऍड.चिंतामणी घाटे व मुख्यध्यापिका, मृगजा कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.