Nigdi : परिसरात दहशत माजविण्यासाठी तरुणावर प्राणघातक हल्ला; 28 जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – परिसरात दहशत माजविण्यासाठी 28 जणांच्या टोळक्याने एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला. तसेच लोखंडी कोयते आणि तलवारी हवेत फिरवून आरडाओरडा करीत परिसरात दहशत पसरवली. ही घटना रविवारी (दि. 15) रात्री ओटास्कीम निगडी येथे घडली.

पप्या उर्फ टोंग्या, जित्या, शिवा आणि त्यांचे 25 साथीदार (सर्व रा. ओटास्कीम निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत या प्रकरणी अमोल रतिलाल क्षीरसागर (वय 21) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल रविवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास त्यांच्या पल्सर मोटारसायकलवरून निगडी येथून जात होते. त्यावेळी सर्व आरोपी हातात लोखंडी कोयते, तलवारी आणि लाकडी दांडके हवेत फिरवून मोठमोठ्याने आरडाओरडा करीत होते. परिसरात दहशत पसरवत या टोळक्याने वाहनांची तोडफोड केली. तसेच अमोल क्षीरसागर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये अमोल गंभीर जखमी झाले. आरोपींनी अमोल यांच्या देखील दुचाकीचे नुकसान केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.