BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi : आजोबांना पंतप्रधान करण्यासाठी मतभेद विसरून काम करा – पार्थ पवार

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विकास केला आहे. आज माझा मित्र माझ्यासोबत फिरताना तो आवाक झाला. तो म्हणाला, “असा विकास मी कुठे पाहिलेला नाही. नरेंद्र मोदी त्यांच्या गुजरातचे मॉडेल देशभर ठेऊ शकतात. तर मग आपण शहराचा विकास राज्यभर का मांडू शकत नाही?, असा प्रश्न मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी उपस्थित केला. आजोबांना (शरद पवार) यांना पंतप्रधान करण्याचे आपले उदिष्ट आहे. त्यादृष्टीने सर्वांनी मतभेद विसरुन कामाला लागावे. आपल्या हातात केवळ 35 दिवस शिल्लक आहेत, असेही ते म्हणाले.

मावळ मतदारसंघात पार्थ यांचे प्रचारदौरे सुरु आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिका-यांसोबत त्यांच्या बैठका सुरु आहेत. शनिवारी निगडी येथील एका कार्यक्रमात बोलताना आपल्याला आजोबांना पंतप्रधान करायच आहे. तेच आपले उदिष्ट आहे. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने कामाला लागला. मतभेद विसरून काम करा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

पार्थ पवार पुढे म्हणाले, ”मागील काही दिवसांपासून मी या भागात फिरतोय. मला इथल्या जनतेन खूप प्रेम दिल आहे. इतक की मला हेच कळेना पार्थ पवार म्हणून तुम्ही प्रेम केल की पार्थ म्हणून. मी तुमच्या प्रेमाने भारावून गेलो आहे. कदाचित मी 18 वर्षांचा असताना इथ काम सुरू केल असत. तर, आत्तापर्यंत माझ लग्नही झाल असत. एवढ प्रेम दिलय तुम्ही मला. उगाचच मी मुंबईमध्ये वेळ घालवला”

.

HB_POST_END_FTR-A1
.