Nigdi : देवदत्त फोटोग्राफी स्कूल आणि गुडलक कॅफे तर्फे ‘फोटो कट्टा’चे आयोजन

एमपीसी न्यूज : देवदत्त फोटोग्राफी स्कूल चिंचवड व सुप्रसिद्ध गुडलक कॅफे (Nigdi) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फोटो कट्टा ही अभिनव संकल्पना निगडी प्राधिकरण येथे साकारली आहे.

अनेकदा फोटोग्राफरला आपल्या कलेला व्यासपीठ देताना अडचणी येतात. पिपंरी चिंचवडमध्ये आर्ट गॅलरी अद्याप सहज सुलभ उपलब्ध नाही व एकमेव गॅलरी महानगरपालिकेची आहे. तिचे भाडे परवडणारे नाही. यावर उपाय म्हणून रेस्टोरंटमध्ये आर्ट गॅलरी असावी, अशी कल्पना होती.

स्मिता शहाडे व सपना मोहिते या गुडलक कॅफेच्या संचलिका आहेत. यांचे सहकार्यातून व देवदत्त फोटोग्राफी स्कूल चिंचवड यांच्या माध्यमातून हा फोटो कट्टा चालवण्यात येणार आहे. दर महिन्याला या ठिकाणी नवीन फोटोचे प्रदर्शन पहाता येईल. नवनवे विषय फोटोग्राफीच्या माध्यमातून या ठिकाणी पहाता येणार आहेत. गुडलक कॅफे हा सुप्रसिद्ध कॅफे असून बन मस्का व इराणी चहा सोबत आता रसिकांना फोटोग्राफीच्या माध्यमातून ‘व्हीज्वल ट्रीट’ मिळणार आहे.

निगडी प्राधिकरणमध्ये पोस्ट ऑफिस शेजारी असलेल्या गुडलक कॅफेमध्ये फोटो प्रदर्शन पाहण्यासाठी कोणतेही शुल्क आकरण्यात येणार नसून हे विनामूल्य आहे.

Pune : संजय जगताप यांना ‘माठ’ म्हणत विजय शिवतरे यांचे प्रत्युत्तर

रविवार दिनांक 2 एप्रिल पासून गुडलक कॅफेमध्ये सुरु होत असलेल्या प्रदर्शनाचा विषय हा कोल्हापूर आहे. कोल्हापूरची लाल मातीमधील कुस्ती, आखाडा, उत्सव, समारंभ आदीचे चित्रण या ठिकाणी पहायला मिळेल.

पिंपरी चिंचवडमध्ये नव्हे, तर पुणे जिल्हातील हा पहिला उपक्रम असल्याचे गुडलक कॅफे तर्फे सांगण्यात आले. निवांतपणे कलेचा आस्वाद घ्यावा, त्यावर चिंतन करावे. चर्चा करावी व फोटोग्राफीमध्ये नवनवीन होणाऱ्या प्रयोगातून व्यक्त होताना संवाद साधता यावा, या हेतूने फोटो कट्टा ही संकल्पना अस्तित्वात आणली असल्याचे मत देवदत्त फोटोग्राफी स्कूलचे संचालक देवदत्त कशाळीकर यांनी व्यक्त केले. वर्षभर याठिकाणी नवनवीन फोटोग्राफ पहाता येणार असल्याचे सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.