Nigdi : फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून 1 मे पासून छत्रपती शिवाजी व्याख्यानमालेचे आयोजन

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, प्राधिकरण, निगडी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी व्याख्यानमाला 1 मे ते 5 मे दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. यावर्षीची व्याख्यानमाला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

व्याख्यानमाला 36 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. बाहेर कोरोनामुळे लाॅकडाऊन लागू केला आहे त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ही व्याख्यानमाला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व व्याख्याने सहकुटुंब सर्वांना ऐकता व पहाता येणार आहेत. व्याख्यानमाला 1 मे ते 5 मे दरम्यान दररोज संध्याकाळी 7 वाजता फेसबुक लाईव्ह करण्यात येणार आहे.

दिनांक 1 मे पासून 5 मेपर्यंत होणारी व्याखानाचे विषय आणि वक्ते यांची माहिती खालीलप्रमाणे :

दिनांक 1 मे रोजी – वरिष्ठ पत्रकार आणि भारतीय राजकारणाचे जाणकार, भाऊ तोरसेकर यांचे ‘करोनानंतरचे जग’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

दिनांक 2 मे रोजी – मुक्त पत्रकार,लेखिका व सोशल मिडियाच्या अभ्यासक, शेफाली वैद्य ‘लॉकडाउनचे धडे’ या विषयावर मत व्यक्त करतील.

दिनांक 3 मे रोजी – सावरकर साहित्याचे अभ्यासक, आनंद रायचूर ‘सावरकरांचे पाचवे सोनेरी पान’या विषयातून इतिहासाला उजळा देणार आहेत.

दिनांक 4 मे रोजी – हिंदू स्वयंसेवक संघांचे विश्व समन्वयक, सौमित्र गोखले ‘विश्व कल्याणाचा हिंदू विचार : जागतिक हिंदूंची भूमिका व कार्य’ या विषयी सविस्तर माहिती देतील.

दिनांक 5 मे रोजी – पुणे येथील प्रज्ञा मानस संशोधिकेच्या प्रमुख डॉ. अनघा लवळेकर ‘काळ कसोटीचा: संवादाला जपण्याचा’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत.

व्याख्यानमाला ‘सावरकर मंडळ’च्या फेसबुक पेजवरून लाईव्ह करण्यात येणार आहे. तसेच न्युज भारती वर ही लाइव्ह पाहता येणार आहे.
अधिक माहितीसाठी कार्याध्यक्ष भास्कर रिकामे, 9028546415 व सचिव प्रदिप पाटील, 9822604751 यांना संपर्क करावा.

तसेच जास्तीत श्रोत्यांनी फेसबुक, व्हाट्सअॅपच्या माध्यमातून व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या सर्व विभागांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.