Nigdi : निगडी प्राधिकरणमध्ये सीएम चषक स्पर्धेनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

एमपीसी न्यूज – निगडी, प्राधिकरण, आकुर्डी, गंगानगर, पंचतरनगर या परिसरातील महिलांना स्वत: चे कलागुण दाखविण्यासाठी भाजप युवती पिंपरी-चिंचवडच्या अध्यक्षा तेजस्विनी कदम यांनी निगडी येथील सावरकर हॉलमध्ये सी.एम.चषक स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धांना महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

_MPC_DIR_MPU_II

या कार्यक्रमाचे उदघाटन माजी महापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप युवा मोर्चाचे सचिव अनुप मोरे, नगरसेविका शर्मिला बाबर, भाजप युवती संघटनेच्या सरचिटणीस श्वेता पाठक आदी उपस्थित होते.

पारंपारिक पध्दतीने स्पर्धा न घेता स्पर्धेतील रांगोळीमध्ये समाजप्रबोधनपर संदेश दिला हा उद्देश असल्याचे भाजप युवती अध्यक्षा तेजस्विनी कदम यांनी सांगितले. विविध नृत्याचे प्रकार सादर करण्यात आले. फिरोज मुजावर आणि तेजश्री अडिगे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. शोभा जोशी आणि डॉ. वैजयंती कुलकर्णी यांनी रांगोळी स्पर्धेचे परीक्षण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती कानेटकर यांनी केले. कार्यक्रमासाठी अनु दोषी, गीता कदम, दीपा चिरपुटकर, शर्मिला महाजन आदींनी सहाय्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1